एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा: सेंटर पॉइंट स्कूलच्या विजयात शतकवीर अध्ययम चमकला

नागपूर : २२ जानेवारी – ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये 16 वर्षांखालील गटातसेंटर पॉइंट स्कूल, दाभाच्या सोमलवार हायस्कूल, निकलास शाखाविरुद्धच्या विजयात अध्ययन राऊतन (99 चेंडूंत 188 धावा) चमकला.
45 धावांत तीन विकेट गमावल्याने एका क्षणी सेंटर पॉईंट स्कूल मोठ्या संकटात सापडले होते. मात्र अध्ययन याने शानदार 188 धावांची खेळत संघाला 40 षटकांत 340 धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरादाखल, सोमलवार स्कूलची मजल केवळ 71 धावांपर्यंत गेली.
16 वर्षांखालील आणखी एका सामन्यात, डावखुरा फिरकीपटू कृष्णा अदलाखिया (5-2) याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टिप टॉप कॉन्व्हेंट स्कूलने भवन्स बी. पी. विद्यामंदिर, श्रीकृष्ण नगर संघावर दहा विकेट राखून आरामात विजय मिळवला. भवन्सने 42 धावांचे आव्हान 6.2 षटकांत एकही विकेट न गमावता पार केले.
नागपुरात14 वर्षांखालील गटासाठी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांसह बाद फेरीची सुरुवात झाली. उपांत्यपूर्व फेरीत कुश शर्माच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगरने पोदार इंटरनॅशनल स्कूल, बेसा संघावर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. कुशच्या सर्वोत्तम 5 विकेटनी पोदारला केवळ 92 धावांवर रोखले. कुशच्या नाबाद 38 धावांमुळे सेंटर पॉइंटने माफत विजयी लक्ष्याचा पाठलाग 10.3 षटकांत केला. 14 वर्षांखालील दुसर्‍या सामन्यात सिद्धेश रत्नपारखीने हॅटट्रिकसह 6 विकेट घेत नारायणा विद्यालम, कोराडी संघाला अवघ्या 8 धावांमध्ये गुंडाळले. प्रथम फलंदाजी करताना सोमलवार हायस्कूल, रामदासपेठने कृष्णा सरतकरच्या 103 धावांच्या खेळीमुळे 40 षटकांत 341 धावा केल्या. त्यानंतर कृष्णाच्या जादुई स्पेलसमोर नारायणा विद्यालमच्या फलंदाजीचे तीन तेरा वाजते. परिणामी, सोमलवार हायस्कूलला 333 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक-
वर्षांखालील मुले गट-
1.सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर-32.4 षटकांत सर्वबाद 92 (प्रथम घाटे 31; कुश शर्मा 5-24) पराभूत वि. पोदार इंटरनॅशनल स्कूल बेसा-10.3 षटकांत 93/2 (राधे महादने 41, कुश शर्मा 38*).सामनावीर- कुश शर्मा

  1. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ-40 षटकांत 341/6 (कृष्णा सरतकर 103; ध्रुव अटोने 4-94) विजयी वि. नारायणा विद्यालयम, कोराडी 4.1 षटकांत सर्वबाद 8(सिद्धेश रत्नपारखी 6-4, कृष्णा सरतकर 4-33). सामनावीर- कृष्णा सरातकर
  2. ऍस्पायर इंटरनॅशनल स्कूल, वर्धा रोड-40 षटकांत 6 बाद 222 (कश्यप पाटरकर 67; ओंकार टाटावार 3-33) विजयी वि. सरस्वती विद्यालय हायस्कूल, शंकर नगर-35.4 षटकांत सर्वबाद149 (यश चौडे 85; मयूर शर्मा 4-16). सामनावीर- मयूर शर्मा.
  3. श्री राजेंद्र हायस्कूल, कोठी रोड-40 षटकात 217/5 (आर्यन नागपुरे 65, क्रिश सोनकुसरे 64; तन्मय पवार 2-49) विजयी वि. कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल, लक्ष्मीनगर-176 षटकात सर्वबाद सोनकुसरे 5-48). सामनावीर- क्रिश सोनकुसरे.

16 वर्षांखालील मुले –

  1. टिप टॉप कॉन्व्हेंट स्कूल, दीनदयाल नगर-14.1 षटकांत सर्वबाद 41 (कृष्णा अडलखिया 5-2) पराभूत वि. भवन्स बी.पी. विद्या मंदिर, श्रीकृष्ण नगर 6.2 षटकांत 42/0.सामनावीर- कृष्णा अडलाखिया
  2. सेंटर पॉइंट स्कूल, दाभा-40 षटकांत 340/7 (अध्ययन राऊतन 188; नचिकेत डोईतळे 2-26) विजयी वि. सोमलवार हायस्कूल, निकलस शाखा 28.4 षटकांत सर्वबाद 71 (राज कापसे 4-5) पराभूत. सामनावीर- अध्ययन राऊतन.
  3. सेंटर पॉइंट स्कूल, वर्धमान नगर-40 षटकांत 228/9 (देवराज पाटील 95; राम अनंतवार 2-33, भाविक ठेंगरे 2-42) पराभूत वि. द साउथ पब्लिक स्कूल, ओंकार नगर-37.5 षटकांत 5 बाद 232(भाविक ठेंगरे नाबाद 67).सामनावीर- भाविक ठेंगरे.

Leave a Reply