रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्त्सवानिमित्त वृक्षारोपण

नागपूर : २५ ऑगस्ट – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रत्न बहुउद्देशीय संस्था तसेच ब्ल्यू ड्रीम कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने खापरी पुनर्वसन येथे स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने रत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दीनदयाल वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून अतुलकुमार पुनवटकर, संस्थाध्यक्ष सुधीर राऊत, ब्लू ड्रीम कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका रंजना सोमकुवर, विदर्भ खुले निवारा गृहाचे अधीक्षक शेखर गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
दीनानाथ वाघमारे व संस्थाध्यक्ष सुधीर राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले दरम्यान वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी ब्लु ड्रीम कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांसाठी भारत देशातील विविध राज्यांचे वेशभूषा सादर करून चिमुकल्यांनी उपस्थित आमचे लक्ष वेधून घेतले. यासह सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. यावेळी बोलताना वाघमारे म्हणाले की लोकांनी स्पर्धात्मक युगात परिश्रम घेऊन प्रगती करावी. याकडेच युवकांनी लक्ष केंद्रित करावे, असेही ते म्हणाले. यासह सुधीर राऊत रंजना सोमकुवर यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मनीषा जुमडे यांनी तर आभार सौ. पाटील यांनी मानले.
यशस्वीतेसाठी निशिकांत मानवटकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply