स्मशानभूमीलगत आढळला मादी बिबट्याच्या मृतदेह

चंद्रपूर : १४ मे – ब्रम्हपुरी तालुक्यातील कुडेसावली स्मशानभूमीलगत एक मादी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागात खळबळ उडाली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रातील हळदा बिटातील कक्ष क्रमांक 1178 मध्ये हा बिबट मृतावस्थेत आढळला. कुडेसावली येथील नागरिक सायंकाळच्या सुमारास फिरायला गेले असता, त्यांना दुर्गंधी आली. नागरिकांनी घटनास्थळ परिसरात पाहणी केली असता, बिबट मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एल. शाह, वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Leave a Reply