वाशिममध्ये शिक्षकाने केला विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार

वाशीम : २६ डिसेंबर – कारंजा शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या गुरुमंदिर संस्थानच्या वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांना वेदमंत्रांचे शिक्षण देणाऱ्या गुरुजींनी विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केल्या जात आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली.
गुरुंमदिर परिसरात असलेल्या वेद पाठ शाळेत विद्यार्थ्यांना वेदमंत्रांचे शिक्षण दिल्या जाते. वेद पाठशाळेत अध्यायत्म व नैतिक आचरणाचे धडे देण्यात येतात. वैदीक अभ्यास असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थ्यासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याने पालकांचा विश्वास उडाला असल्याची भावना व्यक्त केल्या जात आहे. या पाठशाळेतील शिक्षक अजय भगवानराव पाठक वय ४४ वर्षे यांनी अल्पवयीन १३ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची फिर्याद पीडित बालकाच्या वडिलाने कारंजा शहर पोलिसांत दिली.
त्यावर पोलिसांनी अजय भगवानराव पाठकविरुद्ध कलम ३७७, ५0६, भादंवि ४, ६ व पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. मात्र, भारतीय संस्कृतीत आई नंतर दुसरा गुरू शिक्षकाला मानल्या जाते. असे असताना शिक्षकांकडून असे कृत्य केल्या जाण्याने शिक्षणाचे व समृद्ध संस्कृतीचे माहेरघर मानल्या जात असलेल्या जिल्ह्यातील कारंजा शहरात घडलेल्या या घटनेनंतर जिल्हाभरातील पालक गुरुजी तुम्हीसुद्धा अशा व्यभिचाराचे बळी पडत असाल तर पालकांनी विश्वास ठेवावा तरी कुणावर, अशी भावना व्यक्त करीत आहेत. सदर शिक्षक सुसंस्कृत व शहरात आध्यात्मिक तसेच व्यावसायिक ज्ञानार्जनाची शहरवासियांना आवड आहे.
त्यामुळे, जिल्हाभरातील विद्यार्थी कारंजात ज्ञानार्जनासाठी जात असल्याने या घटनेने शिक्षण क्षेत्रावर काळीमा फासला गेला असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply