नागपूर : १० मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. एक आठवड्यापासून कमी होत असलेली रुग्णसंख्या व वाढत असलेले कोरोनमुक्तीचे आकडे दिसालादायकच म्हणावे लागतील. त्यात आज मृत्युसंख्येतही बऱ्या प्रमाणात घट दिसून आली त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ४३८९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर १०९६९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, आज पूर्व विदर्भात ८२ रुंगांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर शहरात आज २५३० बाधित रुग्ण आढळून आले आहेत तरं ६०६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत आणि ५१ रुंगांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत घट झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात नागपुरात २५३० रुग्णांची नोंद झाली असून त्यात ११४९ ग्रामीण भागातील १३७१ शहरातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४५१६०५ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासात ५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्यात १० रुग्ण ग्रामीण भागातील ३१ शहरातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ८१९३ वर पोहोचली आहे.
आज शहरात १५३१० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ३३११ चाचण्या ग्रामीण भागात तर ११९९९ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. आज ६०६८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३९२२६९ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्तीचा दर ८६.८६ टक्क्यांवर गेला आहे. सध्या शहरात ५११४३ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २४९७२ ग्रामीणमधील तर २६१७१ शहरातील रुग्ण आहेत.