अभिनेता सोनू सूद यालाही कोरोनाची लागण


मुंबई : १८ एप्रिल – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे.
नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.
बॉलिवूड विश्वात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सोनू सूदने खऱ्या आयुष्यात मात्र नायकाची भूमिका बजावली आहे. कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला धावून आलेल्या सोनूने सगळ्याच गरजवंतांची वेळोवेळी मदत केली. स्थलांतरितांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यापासून सुरू झालेला त्याचा हा मदतीचा ओघ आता बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला.

Leave a Reply