तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील ४ कलावंतांना कोरोनाची लागण

मुंबई : १६ एप्रिल – कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान कोरोनाचा कहर आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतही पाहायला मिळत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या चार कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या घरातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमानुसार मालिकेच्या सेटवर कोरोना चाचणी करणं बंधनकार आहे. यामुळं अगदी बॅकस्टेज आर्टिस्ट पासून पडद्यावर झळकणाऱ्या कलाकारांपर्यंत सर्वांना ही टेस्ट करावी लागते. त्यामुळं तारक मेहताच्या सेटवर 110 जणांची चाचणी घेण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी चार जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टमुळं सध्या सेटवर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या कलाकारांची नाव निर्मात्यांनी जाहीर केलेली नाहीत. मात्र यापुर्वी मंदार चांदवडेकर आणि मयुर वकानी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळं मालिकेचं चित्रीकरण पुन्हा एकदा थांबवलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply