ऑटोरिक्षावर घर लिलावाची अनाऊन्समेंट करणाऱ्या रिक्षाचालकांवर हल्ला

भंडारा : २२ जानेवारी – ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची अनाऊन्समेंट जिव्हारी लागल्याने एका तरुणाने ऑटोरिक्षाचालकावर बैलगाडीच्या उभारीने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. ज्ञानेश्वर गोवर्धन वैद्य (वय 33) रा. वरठी, ता. मोहाडी असे जखमीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोरिक्षावर लाऊडस्पीकर लावून घर लिलावाची अनाऊन्समेंट जिव्हारी लागल्याने एका तरुणाने ऑटोरिक्षाचालकावर बैलगाडीच्या उभारीने हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली आहे. ज्ञानेश्वर गोवर्धन वैद्य (वय 33) रा. वरठी, ता. मोहाडी असे जखमीचे नाव आहे.
तो अर्बन बँकेच्या मोहाडी शाखेच्या आदेशावरून डोंगरगाव येथे लिलावाची अनाऊन्समेंट करण्यासाठी ऑटोरिक्षाने गेला होता. सायंकाळी तो ऑटोरिक्षावरून गुंजनलाल मिश्रा यांच्या घराच्या लिलावाची अनाऊन्समेंट करीत होता. त्यावेळी तेथे गोल्डी ऊर्फ युगदत्त मिश्रा (45) आला. तू कशाला अनाऊन्समेंट करतो, तत्काळ अनाऊन्समेंट बंद कर, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.
त्यावेळी बैलगाडीची उभारी काढून गोल्डीने ज्ञानेश्वरवर हल्ला केला. त्यात तो जखमी झाला. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply