जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर दाखल होणार खंडणीचा गुन्हा

नागपूर : २० जानेवारी – शहरात लग्न, बारसे वा कुठल्याही कार्यक्रमात घुसून जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथींयांच्या टोळ्यांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहेत.
नागपूरमध्ये तृतीय पंथीयांचा उच्छाद चांगलाच वाढाला आहे. आता प्रत्येक चौकात टोळ्या उभ्या असतात. वाहनाचलाकांना पैशासाठी वेठीस धरले जाते. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करून धमक्या दिल्या जातात. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आता चौकांसह कुठल्याही समारंभात जबरीने पैसे मागितल्यास त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी काढले आहे. त्यानुसार शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
तृतीय पंथीयांच्या टोळ्यांनी वस्त्या वाटून घेतल्या आहेत. त्यावरून या टोळ्यांमध्येच अनेकदा भांडणे झाली आहेत. बक्कळ कमाई होत असल्याने काहींनी हा धंदा सुरू केला आहे. तृतीयपंथी नसताना अनेक पुरूष वेषभूषा करून पैसे मागत आहेत.
अनेकदा अवास्तव पैसे मागून घरच्यांना त्रासही दिला जातो. नकार दिल्यास गोंधळ घातला जातो. अश्लिल शिवीगाळ तसेच अश्लिल वर्तनही करण्यात येते. त्यामुळे नाईलाजाने अनेकजण पैसे देत, त्यांच्याकडून पिच्छा सोडवितात. एकप्रकारे तृतीयपंथीयांनी आपली दहशतच निर्माण केली आहे. सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने पोलिस आयुक्तांनी आदेश काढून अशा तृतीतपंथीयांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. हे आदेश १७ फेब्रुवारीपर्यंत अस्तित्वात राहणार आहेत.
असे आहेत आदेश
शहरात तृतीयपंथीयांविरोधात कलम १४४ लागू
टोळी वा एकट्याने कुठल्याही कार्यक्रमात पैशाची मागणी करण्यास मनाई
ट्रॅफिक जंक्शन,चौकात एकत्र येण्यास आणि वाहनचालक, प्रवाशांकडून पैसे मागण्यास मनाई
आमंत्रित केल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात जाण्यास बंदी
आदेशाचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल होणार

Leave a Reply