आत्ता कुठे, ‘आला थंडीचा महिना ‘ – माधव पाटील

यंदा पावसाळा तसा रग्गड- मुसळाधार झाला
असा की तो संपता संपेना
खरं तर नोव्हेंबर मध्ये थंडीला जरा ऊशीर झाला
यंदाची पावसाची धुवाधार
ब्याटीँग पाहून थंडी तर कडाक्याची पडेल असे वाटत होते. पण अलिकडील ग्लोबल वार्मिंग (जागतिक चढे तापमान)मुळे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू कसे बेभान बेभरवशाचे झालेत.त्यात च त्सुनामी सारखी वादळे
सागरी पुर्व पश्चिम किनार पट्टीवरील कमी दाबाचा पट्टा हजर असतोच, असो
नोव्हेंबर महिन्यात थंडी जाणवली पण पुढे डिसें बर मधे कडाक्याची पडेल असे वाटले पण त्याला हि ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे दृष्ट लागली. ऐन थंडीच्या दिवसातच, गेली थंडी कुण्या गावा- म्हणण्याची पाळी यावी.एखादी उशीराने धावणारी ट्रेन मागच्या स्टेशनवरून पुढच्या स्टेशनवर येणारी वेळ समजली की जशी धावपळ होते तशीच मग मायबाप भारतीय हवामान खात्याची होते.मग कुठे कुठे गरज के साथ तर कुथे ढगाळ तर कुठे कडाक्याची थंडी पडेल हा इशारा होतो. त्यामुळे शहरी भागातला माणूस सावध तर ग्रामीण भागातला खेडुत अं शेतकरी कामकरी चक्रावू न जातो.अलिकडे अशा ह्या बेभरवशाच्या वातावरणामुळे अनेक शेतशिवाराताली रब्बी तुर हरबरा ही नगदी पिके धोक्यात आली. मातीमोल यासाठीच की शेतक-यांना, आमदनी अठ्ठनी खर्चा रुपैया चा सामना करावा लागतो.
खरं तर थंडीची मज्जा काही औरच असते. सर्वाधिक चांगला सुखावणारा ऋतू कुठला तर कुणी सहज सांगेल हिवाळा.त्यात मग हिवात हि उर्मी की गरमी आणणारे तमाशांचे फ़ड
विशेषतः ग्रामीण भागात
डेरेदाखल होणे सुरु होते त्यामुळे गावोगावी जत्रांना भलताच चेव येतो. काय ते जळगावकरान्चे, राधा बाई बुधगावकरासारखे तमाशा फ़ड सुलोचनी लावण्या विच्चारुच नका.
काय ते जत्रेत लागणारे तमाशे, एकाहून एक ऊब आणणा-या ठसकेदार आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा- मला लागलाय ठसका… त्या लावणी वर बेभान होणारे येडे रसिक सारं काही ओक्के. राधाबाई चे फ़ड तर एक एक आठवडा फतकल घालून बसायचे.सदुच्ं लग्न हे हुंडा विरोधी वग नाट्य भल्या थंडीतहि मन कसे खिळवून टाके.सदुचा उखाणा, ‘ केळीचं पान
टरटर फाटते- अन मला किनई किनयी यमूचं नाव घ्यायला….. कसं तरीच वाटते’ हे ऐकताच प्रेक्षक हास्य कल्लोळात बुडून जायचे. गेला हरी कुण्या गावा. …उडतो डोळा…. राया आता रिक्षा होवू दे सुरु सारख्या लावण्या तसेच नटराजाचं नृत्य भुरळ पाडीत. अलिकडे मात्र इलेक्ट्रॉनिक मोबाईल माध्यमे आणि बदलत्या काळाच्या ओघात तमाशा फ़ड मागे पडलेत, सरले ते दिवस- उरल्या त्या आठवणी म्हणण्याची वेळ आली पहा.एके काळचे समाज प्रबोधनाचे युग संपले अन
माज प्रबोधनाचे युग आले की काय असे वाटू लागले आहे.डिसेंबर संपला अन आत्ता आत्ता कुठे थंडी जाणवू लागली आहे.या
दोन तीन दिवसांत तापमान घसरून ते दहा च्या आत घरात आले आहे तर विदर्भातील गोंदीयात ते सातच्या आत घरात आल्याचे समजते. श्रीमंतांच्या घरात ऊब आणणारी इलेक्ट्रॉनिक साधने पेटली आहेत तर दुसरीकडे गरिबांच्या झोपडीसमोर गावोगावी मारुतीचया पारावर शेकोट्या पेटल्याचे दृष्य पहावयास मिळत आहे ता शेवटाला जानेवारीत थंडीचा जोर किती राहतो तेच आता पहाणे बाकी आहे.

माधव पाटील

Leave a Reply