अकोल्यातील अंध कलाकारांच्या भीम शक्ती भजन मंडळाच्या भीमगीतांना ऐकण्यासाठी अनुयायांची गर्दी

अकोला : ६ डिसेंबर – भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज (6 डिसेंबर) महापरिनिर्वाण दिन आहे. या निमीत्त महाराष्ट्रातील विविध दुर्गम भागातून आपल्या परिवारासोबत अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाबासाहेबांच्या विचारांना मांडणाऱ्या अनेक अनुयायांना त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येता आलं नाही. मात्र आता कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानंतर अनुयायी दादर परिसरात दाखल झाले आहेत.
यामध्ये अकोला येथील भीम शक्ती भजन मंडळ चैत्यभूमी येथे आले आहे. या भजन मंडळामध्ये सर्वजण अंध आहेत. पण कलेच्या जोरावर ही मंडळी अनेकांची मन जिंकत आहे. आपल्या भजनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त या भजन मंडळाने भजनाच्या माध्यमातून अभिवादन केले आहे. यावेळी त्याचे भजन ऐकण्यासाठी अनुयायीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गेली 10 वर्ष आम्ही भीम शक्ती भजन मंडळ चालवत आहोत. या भजन मंडळामध्ये माझी दोन्ही मुलं आहेत जी जन्मतः अंध आहेत. त्याच बरोबर दुसऱ्या गावातील देखील मुलं माझ्या सोबत असतात. दरवर्षी आम्ही चैत्यभूमी येथे येत असतो. भजन, गाणं, लग्नसमारंभ कार्यक्रम अश्या ठिकाणी हिंदू किंवा बौध्द रीतिरिवाज प्रमाणे देखील आम्ही गाणे म्हणून आपला व सहकाऱ्यांचा उदरनिर्वाह करत आहोत, असं भीम शक्ती भजन मंडळाचे बापूराव इंगोळे यांनी सांगितले.

Leave a Reply