शुक शुक मन्या
आला आला पाऊस

आला आला पाऊस
मी ओलाचिंब
साचलेल्या पाण्यात
माझें प्रतिबिंब

प्रतिबिंबात दडलंय
माझं बालपण
उड्या मारत बसलो
पाण्यात दनदन

दनदन उडयाने
पाणी उडलं दूरवर
ढगाला ही आनंद
पाऊस आला भुरभुर

भुरभुर पावसात
मी बोट सोडली
दूरवर वाहण्या तिने
वाट आपली धरली

चिखलाचे पावडर
पावसाची ती धार
बालमनाने उजळले
माझे सारे घरदार

घरदाराचे सुख
खूप जरी असले
होतो कधी लहानगा
मन माझे भिजले

भिजलेले मन माझे
राहो आनंदाने भरून
कितीही झालो मोठा
राहो बालपण उरून

मनोज वैद्य, महाल,नागपूर

Leave a Reply