विदर्भात दाखल होताच राणा दाम्पत्यावर पुन्हा गुन्हे दाखल

अमरावती : ३० मे – राणा दाम्पत्याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी राणा दाम्पत्यावर 341,135,291,143 हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 14 दिवस तुरुंगवास झाल्यानंतर राणा दाम्पत्य 36 दिवसांनी विदर्भात दाखल झालेत. अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले.
राणा दाम्पत्यावर 341,135,291,143 हे गुन्हे दाखल झाले आहेत. नियमांचं उल्लंघन केल्यामुळे हे गुन्हे दाखल केलेत. पोलिसांच्या नोटीस नंतर जामिनाची प्रक्रिया सुरू करू असं राणा यांचे वकील ॲड दीपक मिश्रा यांनी सांगितलं आहे. सर्व गुन्हे बेलेबल असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.
दरम्यान विदर्भात दाखल झाल्यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवास्थानी पोहचले. तिथे दाम्पत्याचा कार्यकर्त्यांकडून दुग्धभिषेक सोहळा पार पडला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला. राणा दाम्पत्य येथून नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचं राणा दाम्पत्यानी सांगितलं आहे.
खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आम्ही 36 दिवसांनी परतलो आहोत. महाराष्ट्रात हनुमान चालिसा बोलण्यास इतका विरोध का होत आहे? दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत.
आमदार रवी राणा यांनी म्हटलं, बजरंगबली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागपुरातील प्राचीन मंदिरात आम्ही दर्शन घेणार आहोत. तेथे हनुमान चालिसा पठण करणार आहोत. पण आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते. म्हणून हनुमान चालिसा पठणला विरोध कऱण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची फौज इथे उभी केली आहे. येत्या काळात हनुमान भक्त आणि राम भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात आलेलं संकट आम्हाला दूर करायचं आहे.

Leave a Reply