नागपूरच्या मधुबन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत ८ कोटींचा घोटाळा

नागपूर : ११ मे – लकडगंजमधील बैरागीपुरा येथील मधुबन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आठ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी अध्यक्षांसह तब्बल १९ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मनोहर बाबूराव राऊळकर, अनिल मधुकर येवले, मुरलीधर नारायण राऊत, अशोक टेकचंद पोपळी, अनिल जर्नादन घिमे, सदानंद हेडाऊ, मुकेश नटिये, सुरेश नत्थू बरडे, संजय सहदेव फुलबांधे, कमलाबाई शंकरराव येवले, नरेंद्र पांडुरंग राऊत, रमेश कृष्णराव दिवटे, संजय खेमराव वानखेडे, कपिल विजयराव कुट्टिटे, बबनराव नारायण कडू, पराग मधुकर येवले, कलावती मुरलीधर राऊत, रेखा रमेशराव दिवटे, प्रमोद गंगाधर कोतेजवार, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अध्यक्ष, संचालक व एजंटरांची नावे आहेत.

Leave a Reply