बाजारात गर्दी अन, लग्न वऱ्हाडीस सर्दी … – माधव पाटील

काय मेल्या या सदा कोरोन्यान्ं अवस्था केली धड जगता येईना.रोज सकाळी उठलं की उडत उडतं पहात रहा ते कुण्या गावच्ं आलं ओमाय पाखरू.पोट म्हटलं की जगण्ं आलंच.जगणं म्हटलं की मेहनत आली. नोकरी असेल तर वेळेची अन व्यवसाय म्हटलं की अंग मेहनत आलीच. …. गेल्या दीड दोन वर्षांपासून या नवख्या अती घातक विषाणून्ं तर नाकात दम मास्कला जणू तो नाका तोंडाचा लगामच श्वास घ्यायचा दमान्ं आणि तोंडही उघडायचं दमदमान्ं.शिवाय हात धुवून की जोडून अंतर हि ठेवायचे मोजून मापून. वरुन राजाचं फर्मान हे की आम्हाला निर्बंध लादायचे नाहीत पण गर्दी नकोच. म्हणजे नेमके काय हो उद्धव भौ…. काय तर
एकिकडे बाळ भोंगळे ठेवायचे आणि वरुन म्हणायचे चद्डी घाल बर्ं नाही तर बाऊ चावेल.त्या मुळे काय चाललंय काय या राज्यात हा प्रश्न पडावा.एकिकडे ग्लास सुरु तर दुसरीकडे क्लास बंद एकिकडे हॉटेलात गर्दीची चंदी नि दुसरीकडे लग्नात व-हाडीना बंदी. पंचवीस इकडचे अन पंचे वीस तिकडचे.त्यात म्हणे नवरा नवरी भटजी वाजं- त्री ई.चा समावेश नाही.मग काय नवरा नवरीचे नसणे म्हणजे विघ्नच की….. ते लग्न म्हणजे नुसते व्होटस एपी झाले.हैपी म्यरेज डे किंवा,लगिन हे हर्ष सुखा चे जावो,हा मेसेज पाठवला की झाले,बस्स! घरबसल्या व-हाडी मोकळे.नाही तरी आकाश कोरोना ने भरून आले आहेच शिवाय पाऊसपाणी गारपिट, यष्टी माय बंद. कुणी कुणा कड जायचे नाय गावकीत अमुच्या ठरलंच हाय.इक डं आमच्या एका मित्रानं
संदेश टाईप केला तो असा…….’काय बालिच्ं लग्न जुळलं म्हणे. आता घरातली माणसं पंचवीसचे वर होतात मग आम्ही निर्बंध कशाला मोडायचे.आमच्या शुभेच्छा पाठीशी आहेतच.बाली अन नवीन जावई बापूंना ओंजळ भरून आशीर्वाद…..इति. ———-गेल्या दीड दोन वर्षांपासून हे असेच “चालू” आहे.लग्न असो वा वाढ दिवस वा अन्य समारंभ,जाते हो परदेस पिया-जाते ही खत लिखना…… ————–आजच्याच पेपरात नागपूर येथे सिताबर्डी मेन बाजारातील तुफान गर्दीचा फोटो-त्यात खरेदी साठी प्रचंड प्रचंड गर्दी झाली.तिकडे मुंबईत लोकल मधे तुफान गर्दी.तेथे ना कोरोना ची भिती ना नियमांचे पालन. पण लग्नात मात्रा ओनली फिफ्टी हॉटेलात (!) फिफ्टी.पण त्या हॉटेल ची
क्षमता हजारावर असेल तर पाचशे अन इकडे लग्न सलून अंत्यसंस्कार आदि साठी निर्बंध. लग्नात इधरके पचीस और उधरके पचीस अंत्य यात्रेला इन मीन वीस हा कुठला न्याय.संताप येतो दुसरे काय,?——-मंत्री
तर कार्यक्रमात जमतात पण कित्तेक जण मास्क लावत नाहीत त्याचे काय. खुद्द दादांच्या सभेत पु–पुतण्याला आरं मास्क लाव म्हणण्याची पाळी येते.काल परवा तर कुण्या महापौरांनी डिझाईनवाला मास्क लावल्या वरुन”दादा ” गिरी झाली. म्हणे 95 वाला का लावला नाही.उलट त्यावर चांगलीच जुम्पली म्हणे. … डिझाईन वाला मास्क /फ़ायदा सारखा हे छानसे उत्तर.सारा आनंदी आनंद आमच्या एका मित्राने न्यूज ऐकुन पाहून म्हटले मास्क कोणताहि असो.उलट डिझाईनवाला असेल तर चेहरा स्मार्ट दिसतो मग ती एखादी माधुरी असो वा महापौर,ये हुई ना बात…

माधव पाटील

Leave a Reply