मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

मनातला उदासपणा

माणसाला आयुष्यात जगताना नेहमी एक गोष्ट सतावते, माझ्यासोबतच अस का होतं? मला इतके वाईट आयुष्य का मिळाले? देवाला मिच का सापडली? असे नानाविध विचार मनाच्या कोपऱ्यात वाऱ्यासारखा पिंगा घालत असतात. ह्या विचारांनी माणसाचं मन पोखरून जात. शेवटी काय होता नशिबावर गाडी येऊन थांबते.
तुमचे नशीब चांगले नाही म्हणुन काय तुम्ही नशिबलाच
दोष द्याल का? हे योग्य नाही. स्वतःला दोष देवू नका, गुन्हेगार मानू नका. खरा गुन्हेगार तुमच्या मनातच लपलेला आहे . त्याला तुम्ही ओळखा. तोच गुन्हेगार हळूहळू तुमच्या ‘ स्व’ पणाचा घट करतो.
माणसाच्या सर्वात घातक शत्रू म्हणजे आळस. माणसाच्या काही वाईट सवयी, काही नकारात्मक विचार, बैचेनपणा, क्षणभरच सुख, कोणत्याही गोष्टीबद्दल वाटणारे आकर्षण, वस्तू , व्यक्ती, परिस्थिती ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या काळासाठी आनंद देतात, तुमचा वेळ व आयुष्य हे वाया घालवतात.
आयुष्यात ह्या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी काहीतरी मार्ग तुम्हाला काढावा लागतो आणि त्यातून तुम्हाला जावं लागतं. आळस, सवय व आकर्षण या तीन गोष्टी तुमच्या मार्गातल्या सर्वात मोठा अडथळा स्पीड ब्रेकर आहे
याचा अर्थ असा नाही की आनंद घेऊ नका, आनंद घ्या तुम्ही, पण तुम्ही वेळ पाहून त्यातला आनंद वेचा.
या सगळ्यांपासून वाचायचे असेल तर तुमच्या मनात लपलेल्या गुन्हेगाराला माराव लागेल म्हणजे स्वतःला बदलाव लागेल म्हणून स्वतःला बदला. सत्कर्म करा त्यात तुम्ही वेळ घालवा म्हणजे प्रत्येक गोष्टींची एक वेळ असते ती तुम्ही समजून घ्या, केव्हा काय करावे, कसे करावे, व का हे तुम्ही समजून घेतले तर बरे होईल.
आज मानवाला बाह्य सुखाची खूप सवय लागली आज जो तो या सुखाच्या मागे धाव घेत आहे. पाहणे, ऐकणे, खाणे, गंध आणि स्पर्श यातून जितके सुख घेता येईल तसे तो मिळवण्याचा प्रयत्न करतो परंतु ह्या बाह्य सुखापेक्षा आंतरिक सुख किती मौल्यवान आहे याची जाण मनुष्याला नाही. म्हणूनच म्हणतात ‘अंतर्मुखी सदासुखी’ हे काय खोटे नाही.
माणसाचे मन सतत बिझी असते कसं, डोळे सतत बाह्य विश्र्वातल्या व्यक्ती, वस्तू व पदार्थ यांना बघण्यात व्यस्त असतात. जे आपण बघतो त्याचा परिणाम आपल्या मनावर होतो. नकळतपणे एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपण बघितली तर ती स्वप्नात येते तेव्हा वाटतं की त्या वस्तूची छाप आपल्या मनावर पडली आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच की आयुष्यात डोळ्याद्वारे अनेक चांगल्या वाईट गोष्टी आपल्या मनात उतरतात. आपले कान सतत काही ना काही ऐकण्याचा आनंद घेत असतात. जगातल्या बातम्या काय चाललंय हे बघण्यात जास्त रस दाखवतात. जे कामाचे आहे ते ऐकण सोडून आपण वायफळ गोष्टी ऐकण्याचा आनंद घेत असतो.
आज स्वतःला आंतरिक शक्तींनी संपन्न केलं तर वाईट परिस्थितीत सुखी-समाधानी शांत असल्याचा अनुभव आल्यावाचून तुम्हाला राहणार नाही जे चांगलं ते आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे ही विचारांची फोड मनाच्या बरणीत भरा व त्यातले फेकण्यासारखे ते फेकून द्या तरच ती मनाची बरणी तुमच्या मनाला जीवनाचा चांगला आनंद देऊ शकेल.

पल्लवी उधोजी

Leave a Reply