बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकांचा महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

बुलडाणा : १० जानेवारी – बुलडाणा जिल्ह्यात एका परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने एका महिलेला शाळेत बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे केले आहेत. आरोपीनं शाळेत काम असल्याचं सांगून पीडितेला शाळेत बोलावून घेतलं, याठिकाणी कुणी नसल्याचं पाहून पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी घाबरलेल्या महिलेनं आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे. रुस्तम रामभाऊ होनाळे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी मुख्याध्यापकाचं नाव आहे. आरोपी होनाळे हा नांदुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक कन्या शाळेवर मुख्याध्यापक आहे.
तर पीडित महिला याच शाळेत शालेय पोषण आहार बनवण्याचं काम करतात. घटनेच्या दिवशी शाळेत कुणीही नव्हतं. याचा फायदा घेऊन आरोपीनं शाळेत काम असल्याचं सांगून पीडित महिलेला बोलावून घेतलं. काही कार्यलयीन काम असेल म्हणून पीडित महिला शाळेत गेल्या. यावेळी शाळेत कुणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीनं पीडितेशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी घाबरलेल्या फिर्यादी महिलेनं कशीबशी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि थेट नांदुरा पोलीस स्टेशन गाठलं. पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार, नांदुरा पोलिसांनी संशयित आरोपी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. शाळेतील मुख्याध्यापकानेच शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्यानं शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply