अमरावतीत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतच मद्यपान करून केले नृत्य

अमरावती : १० जानेवारी – अंजनगाव तालुक्यातील हिरापुर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर अभ्यंकर शाळेच्या रुममध्ये मद्यपान करून गाण्यावर नृत्य करत असताना गावच्या सरपंच सुवर्णा बरडे व गणेश मानकर यांनी गुरुजींना हटकले असता गुरुजींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन शाळेच्या बाहेर जाण्यास सांगितले. अशी तक्रार सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. या अगोदरसुद्धा मुख्याध्यापक भास्कर अंभ्यकर यांच्या मद्यपान करून शाळेत येत असतानाच्या बरेच वेळा तक्रारी वरिष्ठ अधिकार्यांना करण्यात आल्या असतानासुद्धा मुख्याध्यापक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. आता मात्र, कोणती कारवाई होणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मुख्याध्यापक भास्कर अभ्यंकर यांनी दारू पिऊन केलेल्या वर्तनाबाबत,केंद्रप्रमुख, सरपंच व मी यांना घेऊन त्यांचे समक्ष मी सदर प्रकरणाची चौकशी ,तसेच पुरावे गोळा करून अहवाल तयार केला आहे. सदरचा अहवाल हा सोमवारी गटविकास अधिकारी यांचे कडे सादर करण्यात येईल ,व सदर प्रकरणाबत गट विकास अधिकारी निर्णय घेऊन कार्यवाहीसाठी आदेश देतील असे विस्तार अधिकारी रंजना हरिश्चंद्र गायगोले यांनी सांगितले.सदर शिक्षकाचे चुकीचे वर्तनाबाबत ची तक्रार ही सरपंचांनकडून संध्याकाळी ५.३0 वाजता प्राप्त झाली. त्यामुळे आजच्या झालेल्या प्रकाराबाबत मी वरिष्ठांकडे कळवले, परंतु तक्रार उशिरा प्राप्त झाल्यामुळे उद्याला सदर प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे विस्तार अधिकारी विनोद पाटील यांनी सांगितले.हिरापूर जिल्हा परिषद शाळेतील प्रकार, अंजनगाव तालुक्यात ठरत आहे चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply