१० वर्षाच्या चिमुकलीवर ४ वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या ६६ वर्षीय नराधमाला अटक

नागपूर : ९ जानेवारी – हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीत एका १0 वर्षांच्या चिमुकलीच्या अपरिपक्वतेचा फायदा घेत ६५ वर्षांच्या एका नराधमाने मागील चार वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ती वर्ग पहिलीमध्ये असल्यापासून तो तिच्यासोबत असे कृत्य करीत होता. परंतु, एका घटनेनंतर आईच्या लक्षात ही बाब आली आणि हे बिंग फुटले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नरधमाला अटक केली असून, त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गणेश सीताराम कावळे (वय ६६) असे या नरधमाचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकली ही तिच्या आई-वडिलांना एकुलती एक आहे. तिची आई गृहिणी असून, वडील भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या परिसरातच त्यांच्या घरापुढे सीताराम कावळे हा राहतो. तोदेखील भाजीपाला विक्रीचे काम करतो. पीडित चिमुकली ही घरापुढे असलेल्या काही मुलींशी खेळायला बाहेर यायची. यावेळी आरोपी गणेशच्या घरी कुणी नसल्यावेळी तो तिला घरी बोलावून तिच्यावर जबरी अत्याचार करीत होता. या चिमुकलीला यासंदर्भात काहीही कळतही नव्हते. परंतु, वर्ग पहिलीपासून तिच्यावर हा प्रकार सलग वर्ग पाचव्या वर्गापर्यंत होत असल्यामुळे हे कृत्य योग्य की अयोग्य हे ठरविण्याची तिची परिपक्वता आणि तसे वयही नव्हते. दरम्यान, ४ जानेवारी रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास पीडिता ही तिच्या मैत्रिणीशी खेळत होती. यावेळी पीडितेची आई त्या ठिकाणी पोहोचली. यावेळी पीडिता आणि तिची मैत्रीण हे दोघेही विचित्र अवस्थेत दिसून आले. याबाबत तिच्या आईने हा काय प्रकार आहे? असा जाब विचारला. यावेळी मुलीने आपल्या घरासमोरील काकाजी असेच करतात, असे सांगितले. त्यानंतर आईचा राग अनावर झाला. त्यानंतर सबब प्रकरण हे पोलिस ठाण्यात पोहोचले. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

Leave a Reply