सुधारित नियमावली जाहीर करत निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई : ९ जानेवारी – प्रशासनाकडून ब्युटी पार्लर आणि जिमवरील निर्बंधात शिथिलता देण्यात आले आहेत, तसे सुधारीत आदेशही काढले आहेत. ब्युटी पार्लरला ५० टक्के क्षमतेनं परवानगी देण्यात आली आहे. तर जिममध्येही ५० टक्के क्षमतेनं परवानगी असणार आहे. दोन ड़ोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी जाता येणार आहे, तसेच मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. राज्यात कोरोनाच कहर वाढल्याने राज्य शासनाकडून काल नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे, यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते, शनिवारी जारी केलेल्या आदेशात जिम आणि ब्युटी पार्लर बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज सुधारीत आदेश काढत काही निर्बंधासह जिम आणि ब्युटी पार्लर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
आज मध्यरात्री पासून राज्यात कडक निर्बंध लागत आहेत. त्यातच आज महापैर किशोरी पेडणेकर मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत, पाहणी करत आहेत. नागरिकांना मास्क लावण्याचं आवाहन करत आहेत. आज जूहू चौपाटीला भेट देत महापौरांनी लोकांना मास्क लावण्यास आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले.
मंत्री अस्लम शेख यांनी मालाड जंबो कोविड सेंटरला भेट दिली आणि कोविड केंद्राच्या तयारीचा आढावा घेतला, यावेळी अस्लम शेख म्हणाले की, मालाडच्या कोविड सेंटरमध्ये 2100 पेक्षा जास्त खाटा आहेत, मुलांसाठी एक केंद्र देखील बनवण्यात आले आहे, विशेषत: लहान मुलांच्या बेड देखील त्यांना खेळण्यासाठी ठेवण्यात आले आहेत, संपूर्ण वैद्यकीय टीम तयार आहे, सध्या येथे सुरू झालेल्या लसीकरणाचे उद्दिष्ट 500 होते, मात्र दररोज 1000 लोकांना लसीकरण केले जाते. आजपासून आम्ही मालाडच्या कोविड सेंटरमध्ये कोरोना रूग्णांची भरती करण्याचे काम करू, आज येथील डॉक्टरांसह सर्व व्यवस्था बघून असे वाटते की, आम्ही पूर्णपणे तयार आहोत, सध्या 2100 खाटा आहेत, गरज भासल्यास आणखी वाढवता येतिल, आणि येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णाला बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले. राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने प्रशासन जोमाने कामाला लागले आहे, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुंबईतील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

Leave a Reply