भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या १० पाकिस्तानी नागरिकांना तटरक्षक दलाने केली अटक

नवी दिल्ली : ९ जानेवारी – भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या दहा पाकिस्तानी नागरिकांना तटरक्षक दलानं पकडल्याची मोठी माहिती समोर आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिक ‘यासीन’ नावाच्या बोटीसह अरबी समुद्रातील भारतीय सागरी हद्दीत शिरले होते. काल रात्री (8 जानेवारी) एक ऑपरेशन राबवून तटरक्षक दलाने ही मोठी कारवाई केली आहे.
यावेळी सुरक्षा दलाने एक पाकिस्तानी बोटही ताब्यात घेतली आहे. संबंधित सर्वांना चौकशीसाठी पोरबंदर याठिकाणी आणण्यात आलं आहे. संबंधित नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.
खरंतर, भारतीय सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या बोटीला पकडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील भारतीय तटरक्षक दलाने अनेकदा पाकिस्तानी बोटीवर कारवाई केली आहे. अलीकडेच गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत तटरक्षक दलाने एका पाकिस्तानी बोटीला पकडलं होतं. यावेळी संबंधित बोटमध्ये १२ पाकिस्तानी नागरिक होते.

Leave a Reply