नागपुरात ३३ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व सुपारीचा साठा जप्त

नागपूर : ९ जानेवारी – अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभागाच्या संयुक्त धाडीत जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर प्रशासनाने धडक मोहीम राबवून प्रतिबंधित अन्नपदार्थ व सुपारीचा साठा जप्त केला. यामध्ये मे.जी.बी. गृह उद्योग, चिखली लेआऊट, कळमना येथून ३३ लाख १३ हजार ३४0 रुपयांचा १२ हजार ८९४ किलो सुपारीचा साठा जप्त करण्यात आला.
तसेच अरुण कृष्णराव उमरेडकर, भुजाडे मोहल्ला, जुनी मंगळवारी, मोहम्मद साजिद शेख वल्द मोहम्मद ईस्माईल शेख, बकरी मंडी, मोमीनपुरा, सुहास गंगाधर मांडवगडे, निकालस मंदिर फव्वारा चौक, इतवारी, शेर खान हबीब खान, मोमिनपुरा, राहुल अनिल जैस्वाल, यशोधरानगर, रॉयल इंग्लिश स्कूलजवळ, हिंगणा रोड व प्रदीप शाहू, चांदमारी मंदिराजवळ, वाठोडा यांच्यावर प्रतिबंधित अन्नपदार्थ संदर्भात कारवाई करून त्यांच्याजवळून २00८.४५ किलो रुपये २0 लाख ४८ हजार ३५५ किमतीचा सुगंधित तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन येथील सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विनोद धवड, पीयूष मानवतकर, अमर सोनटक्के व अमितकुमार उपलम यांचा समावेश होता. गुटखा, पानमसाला, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू-सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थाचे उत्पादन, वितरण, साठवणूक व विक्री होत असल्याचे आढळल्यास त्याची माहिती प्रशासनास देऊन गुटखाबंदी प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी सहकार्य करावे व जनतेने, विशेषत: युवा वर्गाने अशा प्रकारचे सेवन करू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

Leave a Reply