अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस

अमरावती : ९ जानेवारी – नेरपिंगळाई परिसरात दिनांक ८ जानेवारीला अचानक दुपारी तीनच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाल्यामुळे शेतकर्यांचे तूर, गहू, कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तिवसा चांदूरबाजार रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठी मोठी झाडे जमीनदोस्त झाली असुन वार्याचा वेग इतका मोठा होता की,गावातील अनेकांच्या घरावरील टीन उडून घरांमध्ये पाणी शिरले तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळेचे छप्पर सुध्दा उडाले, शाळा सुरू नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. अनेकांच्या शेतात तूर पिकाची कापणी झाली आहे. याच अचानक गारांसह पावसाने हजेरी लावल्याने तुरीला कोंबाचे स्वरूप तर हवेमुळे शेतातील गहू पूर्णता जमीनदोस्त झाला असुन शेतकर्यांना मोबदला मिळावा म्हणून महसूल विभागाचे तलाठी पाटील, राठोड, तर ग्रामपंचायतचे सरपंच सविता खोडस्कर, राजेश मोहकर, राजेश राऊत, पोलीस पाटील, प्रहार रुपेश गणेश, यांनी.झालेल्या नुकसानाची पाहणी केली. महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात यावे, शेतकर्यांच्या मालाचे झालेले नुकसान. तात्काळ मिळावे अशी मागणी शेतकर्यांनी मार्फत होत आहे. दरम्यान पालकमंत्री यशोमती ठाकूर त्यांनी दखल घेतली असुन काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी रमेश काळे, तहसीलदार ठाकरे, यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
जिल्हयातील अनेक भागामध्ये अचानक आलेल्या वादळी वार्यासह पावसामुळे शेतकर्यांची मोठी पळापळ झाल्याचे दिसुन आले. विशेषता अनेक ठिकाणी पावसासह गारपिट देखिल पडल्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे शरिराला बोचणार्या अशा वातावरणाचा नागरिकांच्या शरिरावर मोठया प्रमाणात परिणाम होत असल्यामुळे जिल्हयात रुग्णाची संख्या देखिल झपाटयाने वाढत आहे.

Leave a Reply