रुग्णवाढ अविरत सुरु, २४ तासात ६९८ रुग्णांची नोंद

नागपूर : ७ जानेवारी – नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सारखी वाढतच आहे. रुग्णसंख्याला ब्रेक लागण्याचे चिन्ह दिसून येत नाहीत. रुग्णसंख्या वाढत असली तरीही नागपूर शहरात कोरोनाने होणारे मृत्यू आटोक्यात असल्याने प्रशासनाची चिंता काही अंशी कमी आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ६९८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनावरील ताण बराच वाढणार असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासात नागपुरात ६९८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या आता ४९६०६५ वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये ५९३ रुग्ण शहरातील, ८९ ग्रामीण भागातील तर १६ जिल्ह्याबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज शहरात एकूण ९०१२ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ३४६५ चाचण्या ग्रामीण भागात तर ५५४७ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढत असली तरीही शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आजही नोंद नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील कोरोना रुग्णांची मृत्युसंख्या १०१२३ वर कायम आहे. आज १३२ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४८३८९२ वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९७.५५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आज कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ३ ग्रामीण भागातील, शहरातील ८० तर जिल्ह्याबाहेरील ४९ रुग्णांचा समावेश आहे. शहरात सध्या २०५० सक्रिय रुग्णांची नोंद असून त्यातील २४६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १७७९ रुग्ण शहरातील तर २५ जिल्ह्याबाहेरील रुग्ण आहेत.

Leave a Reply