नागपुरात ७७ हजारांच्या ब्राऊन शुगरसह दोन आरोपी ताब्यात

नागपूर : ७ जानेवारी – नागपूर शहर झोन ४ पथक मधील अधिकारी व अंमलदार हे नुरुल हसन, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक ४, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली गस्त करून अवैध धंदे करणाऱ्या आरोपितांचा शोध घेत असतांना पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीमध्ये दोन इसम ब्राऊन शुगर नावाचे मादक पदार्थ जवळ बाळगून विक्री करत आहे अशी गुप्त बतमीदाराने दिलेल्या माहितीवरून आरोपी नामें राकेश उर्फ भुऱ्या रमेश वानखेडे वय २८ वर्षे रा. गल्ली न. ६, नंदनवन झोपडपट्टी, नागपूर व रजनीश सुरेशराव पाटील वय ३२ वर्षे रा. रिपब्लिकन नगर, इंदोरा, नागपूर यांना ताब्यात घेतले असता त्यांचे जवळून ७६,७००/- रुपयाचा ब्राऊन शुगर व मोबाईल आणि मोटरसायकल असा मुद्देमाल मिळाल्याने त्यांना पोलीस स्टेशनवर येथे न्यू त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस एक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई ही पथकातील सपोनि एम डी पाटील, सय्यद मुश्ताक, अनिल येनूरकर, संजय सोनावणे, ज्ञानेश्वर बांते, हेमंत पराते, तसेच पोलीस स्टेशन नंदनवांचे आर आर राऊत व शरद टेम्भरे यांनी केली

Leave a Reply