दोन ट्रकच्या भीषण धडकेत एका ट्रकचा क्लिनर जागीच ठार

भंडारा : ७ जानेवारी – राष्ट्रीय महामार्गावरील मोहघाटा जंगल शिवारात पहाटे दोन ट्रकची आमोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एका ट्रकचा क्लिनर जागीच ठार झाला. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ७ तास ठप्प पडून होती.
नागपूर ते रायपूरकडे जाणारा ट्रक क्र एमएच २४ एयु ७८५१ व रायपूर ते नागपुरकडे जाणारा ट्रक क्र एमएच ४0 बीजी ९११७ यांची मोहगाटा वन्यक्षेत्र जंगलातील महामार्गावर भीषण धडक झाली. या धडकेत एमएच २४ – ७८५१ लातूर येथील क्लिनर जागीच ठार झाला तर दुसऱ्या ट्रकचा चालक पळून गेला. त्वरीत ही माहिती कळताच साकोली पोलीस ठाणे निरीक्षक जितेंद्र बोरकर, लाखनी येथील कमांडो पथकाचे निरीक्षक सुरेश आत्राम तर महामार्ग गडेगांव पोलीस अधिकारी प्रमोद बघेले, पीएसआय कुंभारे, एएसआय धिरज खोब्रागडे, वाहतूक पोलीस आश्विन भोयर, स्वप्निल गोस्वामी, राजेश बांते, आचले कडव, गणविर, कापगते, राजेंद्र कुरूडकर, गभणे व इतर पोलीस आणि अशोका बिल्डकॉनच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी १0.३0 वाजता ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. घटनेचा तपास साकोली पोलीस करीत आहे.

Leave a Reply