जागतिक सन्मानाने सन्मानित डॉ. उदय बोधनकर

मध्यभारतातील प्रथितयश बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय गोविंदराव बोधनकर यांना नुकतेच कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ अॅयन्ड डिसॉबिलिटी या जागतिक संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे डॉ. बोधनकर हे पहिले आशियाई डॉक्टर आहेत. डॉ. बोधनकर हे नागपूरचेच, त्यांची वैद्यकीय कारकीर्द नागपुरातच बहरली आहे. त्यांना हा सन्मान प्राप्त झाला हे समस्त नागपुकरांसाठीच नव्हे तर प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद आहे.

7 jan uday 1

कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर हेल्थ अॅिन्ड डिसॉबिलिटी ही जागतिक स्तरावर कार्यरत असलेली सेवाभावी संघटना असून जागतिक आरोग्य संघटनेशी संल्गनीत आहे. बालकांचे मानसिक आरोग्य, अपंगत्व प्रतिबंधन माता व बाल आरोग्य तसेच पुर्नपादक आरोग्य या क्षेत्रात ही संघटना काम करते. जगभरातील 53 कॉमनवेल्थ देशांमध्ये आरोग्य विकास तांत्रिक कौशल्याची देवाण-घेवाण आंतरदेश प्रशिक्षण आणि आरोग्य शिक्षणाचा प्रसार या विषयात ही संघटना सक्रिय आहे. या संघटनेच्या मुख्य संरक्षक इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ या असून जगभरातील मान्यवर या संघटनेचे पदाधिकारी आहेत. विशेष म्हणजे डॉ. बोधनकर हे 2008 पासून या संघटनेत सक्रीय. असून 2018 पासून त्यांना या संघटनेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या संघटनेत विविध पदांवर कार्यरत राहून त्यांनी मोलाची कामगिरीही बजावली आहे.

7 jan uday 2डॉ. बोधनकर हे फक्त नागपुरातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेले बालरोगतज्ज्ञ आहेत. त्याशिवाय त्यांची सामाजिक बांधिलकीही लक्षणीय आहे. एक डॉक्टर म्हणून नव्हे तर एक चांगला मित्र म्हणून ते सर्वच क्षेत्रात ख्यातनाम आहेत. सर्व राजकीय पक्षात त्यांची मैत्री आहे. फक्त राजकीय पक्ष नव्हे तर कला, साहित्य, विज्ञान, शिक्षण या क्षेत्रात त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
डॉ. बोधनकर यांनी दिव्यांग बालकांच्या संदर्भात एक डॉक्टर म्हणून जे काम केले त्याची दखल घेत त्यांना कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ अॅरन्ड डिसॉबिलिटी या संघटनेतर्फे हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या संदर्भातील भारतातील सर्वात पहिली परिषद 1992 साली नागपुरात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे संयोजक म्हणून डॉ. बोधनकरांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या पाठपुराव्याने भारत सरकारने 2016 साली दिव्यांगांसाठी विशेष कायदाही लागू केला. त्यामुळे भारतातील दिव्यांगांसाठी नवे दालन उपलब्ध झाले होते. त्याचीच दखल जागतिक स्तरावर घेतली गेली आहे.
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेले डॉ. उदय बोधनकर शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून गाजले होते. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतल्यावर त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणूनच करिअर करण्याचे ठरवले. काही काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरी केल्यावर 1988 मध्ये त्यांनी नागपुरात खाजगी प्रॅक्टीस सुरु केली. तेव्हापासून आघाडीचे बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांना नालौकिक मिळविला आहे.

7 jan uday 3याचबरोबर जागतिक स्तरावरील बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेतही ते सुरुवातीपासून सक्रिय राहिलेले आहे. वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्षपदी मिळविले आणि त्यापाठोपाठ जेसीआय इंटरनॅशनल या संघटनेचा आऊटस्टॅडिंग यंग डॉक्टर ऑफ दी वर्ल्ड हा पुरस्कार मिळविला. यापूर्वी हा पुरस्कार फक्त स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांनाच मिळाला होता. आज जसे बालरोगतज्ज्ञ म्हणून ते गाजले तसेच एक उत्तम शिक्षक म्हणूनही ते गाजले आहेत. जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये ते निमंत्रित व्याख्याते म्हणून अनेकदा जात असतात.
डॉ. बोधनकर जसे वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ आहेत तसेच ते रसिक वाचक आणि लेखकही आहेत. त्यांचे तिमिरातून उदयाकडे हे आत्मचरित्र मराठीत तर प्रचंड गाजलेच. पण त्याचबरोबर हिंदीतही त्याचा अनुवाद प्रकाशित झाला. आता इतर भारतीय भाषांमध्येही हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.

7 jan uday 4डॉ. बोधनकरांच्या या वाटचालीत त्यांच्या कुटुंबियांचाही महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात. डॉ. बोधनकरांच्या पाठीमागेही त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीती, त्यांचे चिरंजीव निखील (सध्या मुक्काम युएसए) त्यांच्या सुनबाई आणि कन्या प्रियंका हे सर्वच खंबीरपणे सहकार्य देण्यास कायम तत्पर असतात.
अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाला जागतिक स्तरावर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ही निश्चित अभिनंदनीय बाब आहे. त्यासाठी डॉ. बोधनकर यांचे हार्दिक अभिनंदन विशेष म्हणजे डॉ. बोधनकरांनी हा पुरस्कार त्यांना या कामात सहकार्य करणार्या सर्व संघटना आणि व्यक्तींना समर्पित केला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा हा एक नवा पैलू निश्चितच कौतूक करण्याजोगा ठरला आहे. भविष्यातही ते अशीच वाटचाल करत राहतील आणि जागतिक स्तरावर अनेक सन्मान मिळवितील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

अविनाश पाठक

Leave a Reply