गडचिरोलीतील पोर्ला वनपरिक्षेत्रात झुंजीत एका वाघाचा मृत्यू

गडचिरोली : ७ जानेवारी – वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला परिक्षेत्रातील पोर्ला उपक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरा मधील काटली गावाचे तलावाजावळ नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान वनविभागाच्या निर्देशनास आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव सुक्ष्म गडचिरोली मिलींद उमरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व एनटीसीएचे प्रतिनिधी तात्काळ घटना स्थळी उपस्थित झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा ( एसओएस) अनुसार मौका स्थळाच्या आजुबाजूस ५00 मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुरावा शोधण्याकरीता तपासून पाहण्यात आले. प्राथमिक तपासणीवरुन सदर वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
७ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता मृत वाघाच्या मौका स्थळी पंचनामा नोंदवून मृत वाघ पोर्ला वन परिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून उपवनसंरक्षक वडसा विभागीय वन अधिकारी (दक्षता), गडचिरोली वनवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वडसा, वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला, मानद वन्यजीव रक्षक गडचिरेाली यांचे उपस्थितीत पशु वैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ.व्ही. एस.लेखामी पशु वैद्यकीय अधिकारी, गडचिरोली व पशु वैद्यकीय अधिकारी पोर्ला डॉ. बी.आर. रामटेके यांचे चमुने मृत वाघाचे शवविच्छेदन करतांना मृत वाघांच्या मानेवर व पायाला झुंजीतील दुसऱ्या वाघाच्या चाव्यांच्या जखमा दिसून आले. तसेच सदरील वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षाचा असावा असा अंदाज वर्तविला. सदर वाघाचे शवविच्छेदन करुन दुपारी १२ वाजता मृत वाघाला दहन करण्यात आले, असे उपवनसंरक्षक वडसा वनविभाग वडसा यांनी कळविले आहे.

Leave a Reply