आमदार प्रतापसिंह राणे यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

पणजी : ७ जानेवारी – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपल्या राजकीय आयुष्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत.
पर्यें मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी नुकतीच आपल्या राजकीय कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. या ५० वर्षात त्यांनी गोव्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष तसेच महत्वाच्या खात्यांची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडली होती. म्हणूनच भाजपा सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आजीवन कॅबिनेटचा दर्जा बहाल केला असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. यापुढे प्रतापसिंह राणे यांना यापुढे कॅबिनेट मंत्र्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा, भत्ते तसेच इतर सुविधा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply