रेल्वेत कार्यरत असलेल्या महिलेची दोन वरिष्ठांची अधिकाऱ्यांच्याविरोधात तक्रार

नागपूर : १४ नोव्हेंबर – नागपूर रेल्वेतील दोन वरिष्ठांची तक्रार महिला अधिकाऱ्यानी सदर पोलिसांत केली. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात सदर पोलिसांनी छेडखानी आणि जातिवाचक शिविगाळीचा गुन्हा दाखल केलाय. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक विकास कुमार कश्यप आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अविनाश कुमार आनंद अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सदर पोलीस ठाण्याअंतर्गत दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेचा विभाग येतो. तक्रारकर्ती महिला अधिकारी ५७ वर्षांची आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, वरील दोन्ही अधिकारी त्यांना वारंवार कॅबीनमध्ये बोलावित होते. जातिवाचक शिविगाळ करून छेडखाणी करीत होते. याविरोधात आवाज उचलला असता सदर महिला अधिकाऱ्याचा आणखी त्रास अधिकच वाढला. फाईल मागण्याच्या बहाण्याने बोलावून त्रास दिला जात असल्याची महिलेची तक्रार आहे. या महिला अधिकाऱ्याने ऑगस्ट २०२१ मध्येच याची लेखी तक्रार सदर पोलिसांत केली होती. तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सदर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सदरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती गुरनुले तपास करीत आहेत.

Leave a Reply