तुमसर नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांची तात्काळ नियुक्ती करा – शिवसेना

भंडारा : ३१ ऑक्टोबर – तुमसर नगरपालिकेचा कारभार सात ते आठ महिने मुख्याधिकार्‍यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात सर्वसामान्यांना लोकांना व जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक कामात अडीअडचणी निर्माण होत आहेत. नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी पद रिकामे असल्याने प्रभारी अधिकारी सातत्याने गैरहजर असतात त्यामुळे कायम मुख्याधिकारी पूर्णवेळ नगरपरिषदेस आवश्यक आहे.
तुमसरकरांच्या विविध प्रश्न समस्या सोडवण्यासाठी आणि नगर परिषदेमध्ये विविध कामे घेऊन येणारे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे.
ही गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ तुमसर नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी, नियमित मुख्य अधिकारी यांची नियुक्त करावी. तुमसरातील नागरिकांच्या समस्या पाहता नगरपरिषदेत मुख्याधिकारी नसणं ही फार वाईट बाब आहे. यामुळे शासनाने लवकरात लवकर मुख्याधिकारी पद भरावे, अशा आशयाचे निवेदन राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देताना शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख निखील कटारे, अरुण डांगरे उपस्थित होते.

Leave a Reply