अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड, दोन मुलींची सुटका आरोपी ताब्यात

नागपूर : ९ ऑक्टोबर – गुन्हे शाखेच्या सामाजिक पथकाने अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली तर एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. पथकाला आकाश बुधारू शाहू (वय २६), रा. एकात्मतानगर, जयताळा, नागपूर हा त्याच्या ओयो अपार्टमेंटमध्ये देहव्यापार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बोगस ग्राहक पाठविण्यात आले. ओयो श्रीधर सर्व्हिस अपार्टमेंट येथे आरोपीची भेट झाली. त्याने दोन मुली दाखवत ६ हजार ५00 रुपयांत सौदा पक्का केला. एक बोगस ग्राहकाला मुलीसोबत अपार्टमेंट मधील रूम नं. २0१ मध्ये तर दुसर्या ग्राहकाला २0२ मध्ये पाठविले. यानंतर त्यांनी इशारा केल्यानंतर पथकाने स्टाफसह धाड टाकली. सुटकेतील मुलींपैकी एका पीडितेस आरोपी आकाश शाहूने कोलकाता (पश्चिम बंगाल) येथून देहव्यवसायाकरिता बोलाविले होते. तर निराधार असल्यामुळे पैशांचे आमिष दाखवून तिला देहव्यापारात आणल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

Leave a Reply