वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

जय उलुकदेवा !

जयदेवा जयदेवा जय उलुकदेवा
आरती ओवाळीता मिळतो सत्तेचा मेवा ।। जयदेव जयदेव ।।

कितीक रूपे देवा तुमची दिसती जगतात !
काका,दादा,नाना,मामु तुम्हांस म्हणतात !
ईडी पिडी टळण्या करतो तुमचा अम्ही धावा ।।
जयदेवा जयदेवा जय उलुकदेवा ।।

तुमच्या नावे चोर लुटारू आतंकिहि तरले !
मोठया मोठया संकटातुनी तुम्हि त्या उद्धरले !
पुन्हा एकदा प्रकरणं सारी निस्तरा बावा ।।
जयदेवा जयदेवा जय उलुकदेवा ।।

तुमच्या नावे म्हणती सारी भूते पळतात !
कारण तुम्ही आहात देवा स्वयं भूतनाथ !
तुमच्या नामाचा तो महिमा किति आम्ही गावा ।।
जयदेवा जयदेवा जय उलुकदेवा ।।

तुमची सुद्धा हालत आता झालीसे पतली !
उडती पतंग आकाशातील जैसी हो कटली !
उरली सुरली कावेबाजी पणा तुम्ही लावा ।।
जयदेवा जयदेवा जय उलुकदेवा ।।

         कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply