तुमसरात ४५० लाभार्थी “निराधार” दोन वर्षापासून प्रकरणे प्रलंबित

भंडारा : ८ ऑक्टोबर – तुमसर तालुक्यात निराधार योजनेचे सुमारे ४५० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. मागील दोन वर्षांपासून शासनाकडून समिती गठीत झाली नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची फरफट होत आहे. कोराना काळातही लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष आहे.
तुमसर तालुक्यात व शहरात निराधार योजनेची शेकडो प्रकरणे दाखल करण्यात आले. परंतु त्यास अजून पर्यंत मंजूरी मिळाली नाही. यात संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजनेचा समावेश आहे. सदर प्रकरने सहा महिन्यापासून प्रलंबित असल्याची माहिती आहे. दोन वर्षापासून शासनाने समितीचे गठण केली नाही. त्याचा फटका सर्वसामान्य लाभार्थ्यांना बसला आहे.
शासनाने निराधार योजनेचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी व तहसीलदार यांची समिती नियुक्त केली. या तीनही अधिकाऱ्यांना सदर प्रकरणे मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यानंतरही अजून पर्यंत निराधार योजनेचे प्रकरने मंजूर करण्यात आले नाही. याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी येथे दखल घेण्याची गरज आहे.
येत्या सोमवारी तहसील कार्यालय तुमसर येथे यासंदर्भात बैठक घेण्यात येणार आल्याची माहिती आहे. शासकीय आधाराची लाभार्थ्यांना अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न येथे पडला आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. सदर प्रकरणाचा निपटारा करण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखाप्रमुख निखील कटारे, अरुण डांगरे, सतीश बनसोड सह शिवसैनिकांनी केली आहे.

Leave a Reply