गोंदियात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटक व साहित्याचा साठा हस्तगत

गोंदिया : ७ ऑक्टोबर – गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत येत असलेल्या भरनोली आऊट पोस्टमधील आंबेझरी ते नागलडोह मार्गावरील जंगलात नक्षल्यांनी पुरून ठेवलेल्या स्पोटक साहित्याचा शोध लावून साठा हस्तगत केला आहे.
गडचिरोली आणि गोंदियाचे पोलीस उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम जिल्हा पोलिसांनी राबवली मिळालेली माहितीनुसार सी 60 जवानांचे पथक आणि पोलिसांची एक चमू सर्चिंग मोहीमेवर असताना त्यांना नागनडोह मार्गावरील जंगलालगतच्या मार्गावर स्पोटके लपवून ठेवल्याचा संशय आल्याने शोध मोहीम सुरु केली असता अंदाजे ६७ डेटोनेटर, २३ जिलेटीन रॉड,वायरसह अन्य विस्पोटक साहित्य घटनास्थळावरुन हस्तगत केले आहे.पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,अप्पर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply