वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

राजकारणाचा पाया ! !

काल बारावीचा निकाल लागला आणि
माझ्या जीवाला भलताच घोर लागला !
घोर यासाठी कि हा निकाल नव्व्यांणव
टक्यांच्या वर लागला !
आता तुम्ही म्हणाल, यात चिंता करण्यासारखं काय आहे ?
ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे
पण मला खरी चिंता पास होणाऱ्यांची नाही तर नापासांचा टक्का प्रचंड घसरला याची आहे !
कारण सारेच जर असे उत्तम रीतीने पास होऊन उच्च शिक्षण घ्यायला लागले तर राजकारणाचं कसं होणार याची आहे !
उच्च शिक्षण घेणारे सारे इंजिनियर , डॉक्टर, प्राध्यापक वगैरे होतात
आणि नापास होणारे राजकारणाचा गाडा चालवतात !
आता या गाड्याला पुढे कोण ढकलणार !
देशाच्या विकासाला यामुळे खीळ नाही का बसणार !
एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ,ती म्हणजे ,
या देशाचं अर्थकारण जसं दारुड्यांवर चालते !
समस्त दारुडे जसे अर्थकारणाचा कणा आहे !
तद्वतच, नापास विद्यार्थी हे या देशाच्या राजकारणाचा पाया आहे!
हा पाया इतकाही ठिसूळ होऊ देऊ नका !
देश आधीच अडचणीत आहे त्याला अधिक खोलात नेऊ नका !

       कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply