मनाच्या हिंदोळ्यावर – पल्लवी उधोजी

हळवं मन

नात्यास नाव आपल्या देऊ नकोस काही
साऱ्यात चांदण्यांची जगतास जाण नाही

विभावरी आपटे यांनी गायलेले नटसम्राट मधले हे गाणे तंतोतंत नात्याला लागू होत. दोन अक्षराचे नातं पण त्याची व्याप्ती हे किती विशाल आहे बघा. नात्यांमध्ये महत्त्वाच्या काय असतं तर तो विश्वास. विश्वासाच्या धागा नात्यांमध्ये अतिशय महत्त्वाचा धागा असतो. त्याच बळावर नातं हे अधिक घट्ट होऊ लागत. नातं हे विश्वासाचं, आपुलकीचं, समजून घेण्याचं, देण्याचं तसेच घेण्याच पण असत. नातं हे असूनही नसणार व नसूनही असणार असत. होय ना.
आपल्या रोजच्या व्यवहारात आपण अनेक उदाहरण बघतो. कालच मी माझ्या व्हाट्सअप ग्रुप मधील जिला मी इतके वर्ष शोधत होती ही माझी बालमैत्रीण मला अचानक दिसली आणि आपसूकच मी लहानपणीच्या दिवसात आपोआप ओढल्या गेली. आम्ही भरपूर गप्पा केल्या याला म्हणतात मैत्रीचा नातं.
कळत नकळत का असेना आपण या नात्यात आपोआप बांधले जातो. हे नातं कधी, कुठे, कोणाशी, कसे, जुळेल माहीत नाही. पण जुळतं हे मात्र नक्की. आपण रोजच्या व्यवहारातील उदाहरण बघू. आपण ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याचं व आपलं नातं. हे रोजच होऊन जाता. आपलं व शाळेचं हे एक अनोखं नातं असतं. लहान असताना आपण तिथे खेळतो त्या मैदानाचं व आपला नातं. आपण कधी विसरतो का? घराच्या आजूबाजूच्या परिसरातील झाडांचा व आपला नातं. आपल्या गॅलरीत येणाऱ्या चिमणा चिमणीचं, पक्षाचं नातं. मी खिडकीत रोज वाटीत पाणी व एका डिशमध्ये दाणे टाकते त्यांचं व माझं नातं. एक दिवस जरी मी दाणे नाही टाकले तर चिमणा चिमणी चिव चिव करतात मग कळतं अरे आज आपण त्यांना दाणे नाही टाकले हे एक प्रकारचा नातं त्यांच्याशी जुळत. एवढेच काय आपल्या कॉलनीत येणारे भाजीवाले, रद्दीवाले, सफाईकामगार, लाईट बिलवाले, सिलिंडर वाले यांच्याशी पण आपले एक नातं जुळत. या नात्याला कोणतेही नाव नसतं. पण यातील कोणी जर त्याच्या वेळेला नाही आला तर मनाला एक रुखरुख लागते मग आपण स्वतःशीच बोलतो आज भाजीवाली नाही आली आज पेपर वाला नाही आला. ही किमया आहे नात्याची. नाही का?
आपला लेक घरातून बाहेर पडतो त्याचं नातं जुळतं शाळेतल्या पाटिशी, नंतर वही-पेन मग शाळेतील शिक्षक, मित्र. मित्राशी नातं हे दृढ होत जातात ते अगदी शेवटपर्यंत. जसजसं वय वाढतं तसतसं ही नात्यांची वेल वाढत जाते. काही काही वेळा नात्यांमध्ये हळवेपणा येतो तर कधीकधी कठोरपणा ही येतो, तर काही वेळा व्यवहार सुद्धा येतो, तर काही वेळा नात्यात आपुलकी, रंगत येते तर कधी हे रंग उडून जातात.
एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीची नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट समजली जाते. रस्त्याने जाताना ओळखीचे दिसले की आपण गालातल्या गालात हसतो. काही नाती टिकतात आयुष्यभर साथ देतात ही नाती अगदी दृढ व्हायला हवी. एवढेच म्हणायचे आहे मला.
गुंतलेली नाती जीवनभर आठवणी देऊन जातात

पल्लवी उधोजी

Leave a Reply