वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मस्कऱ्यांचा गुरू !

बोलती बंद झाली तरी तो बोलतोच आहे !
त्याचाच मंत्री त्याला बघ सोलतोच आहे !

शकुनी म्हणून त्याने अर्जीत केली ख्याती !
झाली कितीकदा हो त्याचीच फटफजीती !

तो काडीबाज त्याने काडी अशी ही केली !
वाघाचिही तयाने मनीम्याव की हो केली !

तो वाटतो मला तर गुरु सर्व मस्कऱ्यांचा !
कोल्ह्यास देई दर्जा ब्रह्मांडनायकाचा !

फितुरी असे तयाच्या रक्तात जन्मजात !
खातोय मीठ ज्याचे त्याचा करील घात !

या बोलबच्चनाचे स्वागत असे करावे
पैजारमाळ त्याला घालून धिंडवावे !

     कवी .. अनिल शेंडे .

Leave a Reply