वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसमाचा मृत्यू

गोंदिया : २२ जुलै – गोरेगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या व संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या भडंगा-पिंडकेपार परिसरातील जंगलात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली. पुना मोहन मेश्राम (६०) रा.भडंगा असे मृतकाचे नाव आहे.
भडंगा ते पिंडकेपार पार क्षेत्रात मागील काही दिवसापासून वाघ वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत माहिती वनविभागाला देण्यात आली होती. मात्र वाघाचा बंदोबस्तासाठी कोणतीच पावले उललले नाही. परिणामी याच परिसरात वाघाने इसमाचा बळी घेतला. पुना मेश्राम हे गावशिवारातील जंगलात बकर्यांसाठी पाने तोडण्याकरिता गेले होते. याचवेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकताच ग्रामस्थांनी जंगलात धाव घेतली.
मात्र तोपर्यंत पुना मेश्राम यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती होताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. विशेष म्हणजे, या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करीत वनविभागाने तातडीने वाघाचा बंंदोबस्त करुन मेश्राम कुटूंबीयांना मदत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply