वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

मंत्री व्हायचंय मला !

बोर्डाचा निकाल नव्यांण्णव टक्यांपेक्षा जास्त लागूनही
एका मंत्र्याचा मुलगा चक्क नापास झाला !
याचा मंत्रीमहोदयांना भयंकर राग आला !
म्हणाले , अरे नालायका, तुझ्यासारख्यांना पास करायला आम्ही येवढा निकाल लावला !
आणि तरीही तू नापास झाला !
आता लोक तुझ्यापेक्षा मलाच जास्त नावं ठेवतील !
तुमचा मुलगा एवढा बुद्धु कसा म्हणून मलाच भंडाऊन सोडतील !”
मुलगा म्हणाला, ” बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका !
माझी तर मुळीच काळजी करू नका !
कारण मला काही शिकुन सवरुन डॉक्टर किंवा इंजिनियर नाही व्हायचं !
शास्त्रज्ञ किंवा प्राध्यापक नाही व्हायचं !
कलेक्टर किंवा कमिश्नरही नाही व्हायचं !
सेक्रेटरी तर मुळीच व्हायचं नाही !
आणि मंत्र्यांच्या मागेपुढे मागेपुढे करायचं नाही !
बाबा माझं ध्येय फार फार मोठं आहे !
मलाही तुमच्यासारखंच मंत्री बनायचं आहे !!”

     कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply