राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: २१ जुलै- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला. कोकणात पावसाचा जोर पाच दिवस कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम आहे, त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
विदर्भात पुढील ३-४ दिवस सर्वत्र पाऊस पडेल. अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस राहणार असन, काही ठिकाणी मुसळधार तर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave a Reply