वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

टारगटांचे टार्गेट !

कोणत्याही युद्धात सेनेला एक टार्गेट दिलेले असते
आणि टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय सेना परत जात नसते !
त्याचप्रमाणे कोरोनाला जन्म देणाऱ्या आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्या टार्गटांचेही काहीतरी टार्गेट ठरलेले दिसते !
आणि ते पूर्ण झाल्याशिवाय कोरोन्याला परत जाण्याची परवानगी
ही टार्गट मंडळी देणार नाहीत असे दिसते !
टार्गेट पूर्ण होइपर्यंत हा कोरोना विक्रम आणि वेताळातल्या गोष्टीप्रमाणे सतत नवनवी रूपे घेऊन येतच राहणार !
आणि त्याच्या लाटावर लाटा येतंच राहणार !
निर्बन्ध!निर्बंध ! निर्बंध ! किती घालणार निर्बंध ? आणि किती काळ घालणार निर्बंध ?
त्याचीही काहीतरी सीमा असायलाच हवी ना ?
माणसांच्या आणि समाजाच्याही सहनशक्तीला काही मर्यादा असतेच ना ?
दीर्घकाळपर्यंत निर्बन्ध लावल्यास लोक भूकमरीने मरतील !
सरकार सुद्धा भिकेला लागेल !
उद्या कोरोनाने मरणाऱ्यांपेक्षा भुकेने आणि आत्महत्यांनी मरणाऱ्यांची संख्या दुपटीने, तिपटीने जास्त असेल !
म्हणून आता असे वाटते कि या निर्बंधांचा अतिरेक बंद करून
होऊन जाऊ द्या सगळं मोकळं !
सक्तीचे टेस्टिंग वगैरेही बंद करून टाका !
आणि घेऊ द्या लोकांना थोडा मोकळा श्वास !
जो जीवनासाठी आवश्यक आहे !

     कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply