वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

हा एक पप्पू ! तो एक पप्पू !

जे आधी विचार करतात नन्तर बोलतात त्यांना साधी माणसं म्हणतात !
आणि जे तोंडात येईल ते ओकतात आणि नन्तर विचार करतातच असेही नाही,
त्यांना लोक प्रेमाने पप्पू म्हणतात !
पप्पू या शब्दाला आज कधी नव्हे येवढं वलय प्राप्त झालं आहे !
मीडियाही त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचतो आहे !
म्हणूनच राजकारण्यांमधे आज पप्पू बनण्याची अहमहमिका लागली आहे!
याचा अर्थ पूर्वी आपल्या देशात पप्पू नव्हतेच असे नव्हे
पप्पुंची ही परंपरा थेट स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच सुरू आहे !
जरा आठवा आपले पहिले पप्पू जे
म्हणाले होते ” चीनने आपली जी भूमी बळकावली तिच्यावर गवताचं
पातं सुद्धा उगवत नाही “!
दुसरे पप्पू म्हणाले होते “, सरकार केंद्रातून जे शंभर रुपये पाठवते त्यातील फक्त पंधरा रुपयेच लाभार्थ्यांपर्यंत पोचतात “
आणि तिसऱ्या पप्पूचं तर काही विचारायलाच नको !
‘ कथासरित्सागरा’तल्या कथांपेक्षाही
अधिक सुरस आणि सुरम्य त्यांच्या कथा आहेत !
आणि त्यांच्याच कटसाईज, पॉकेट साईज, नानो साईज अशा नाना आवृत्या ‘ना ना ‘ करत महाराष्ट्रात तयार होत आहेत !
ही राज्यासाठी नक्कीच भयंकर गर्वाची गोष्ट आहे !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply