कमलनाथ बनणार काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष?

नवी दिल्लीः १५ जुलै –गांधी घराण्याचे विश्वासून आणि निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कमलनाथ यांना काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवले जाण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काही वेळापूर्वीच कमलनाथ यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्राही सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील निवासस्थानी दाखल झाल्या.
काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पदासाठी विश्वासू आणि वरिष्ठ नेते कमलनाथ यांचा पक्षाकडून विचार करण्यात येत आहे. कमलनाथ यांना ही जबाबदारी मिळल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा सध्या पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष नियुक्त करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून सोनिया गांधी या अनेक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाईल, असं बोललं जातंय. पुढच्या वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. पंजाबमधील कलह दूर करण्यात अद्याप यश आलेलं नाही. दुसरीकडे पक्षात नाराज नेत्यांचाही एक गट आहे. यामुळे काँग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply