तिरंदाज मिहीर अपारची पोलंड आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

बुलडाणा::१४ जुलै- महाराष्ट्राचा उदयोन्मुख तिरंदाज मिहीर अपार याची पोलंड येथे होणाऱ्या धर्नुविद्या आंतरराष्ट्रीय युवक अंजिक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सोनपत येथे झालेल्या धर्नुविद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीत समितीने द्रोणाचार्य धर्नुविद्या अँकॅडमी व प्रबोधन विद्यालयाचा खेळाडू मिहीर नितीन अपारची भारतीय संघात निवड केली आहे.
८ ऑगस्टला सुरू होणाऱ्या धर्नुविद्या आंतरराष्ट्रीय युवक अजिंक्यपद स्पर्धेत मिहीर १७ वर्षाखालील गटात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या आधी त्याने शालेय स्पर्धा तसेच असोसिएशनच्या मार्फत झालेल्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तो आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत इलग, वडील नितीन अपार, आई जया पवार, मुख्याध्यापक प्रफुल्ल मोहरील, क्रीडा शिक्षक रविंद्र गणेशे यांना देतो.

Leave a Reply