वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

बेडका ! फुगु नको इतुका….!

एकदा एका बेडकाच्या कानात वारं भरलं !
आणि ते फुग फुग फुग फुग फुगायला लागलं !
विचारलं त्याने मित्राला ,”बघ मी बैलायेवढा मोठा झालो कि नाही ?
मित्र म्हणाला, ” नाही रे नाही, ते कधीच शक्य नाही “
” तू या भानगडीत पडू नकोस ,
चांगला सुखाचा जीव धोक्यात घालू नकोस !”
पण बेडूक काही ऐकेना !
फुगायचं काही थांबवेना !
फुगवता फुगवता अखेर भाता फुटला
आणि बिचारा बेडूक गतप्राण झाला !
काही माणसंही अशीच असतात !
बापाच्या पुण्याईने म्हणा कि नशिबाने ,
लायकी नसतांनाही थोडं मोठेपण मिळालं कि लगेच शेफारतात !
त्यांना आपली बोटे आभाळाला टेकल्यासारखी वाटतात !
आपला जीव केवढा, आपली कुवत किती ,औकात काय ,
या सर्व गोष्टी ते विसरतात !
आणि आपल्याच हाताने आपला
‘ मॅकबेथ ‘ करून घेतात !

      कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply