कुख्यात आरोपीवर जीवघेणा हल्ला करून केले अपहरण

हिंगणघाट : १४ जुलै – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट याठिकाणी एका सराईत गुन्हेगारांच्या टोळक्यानं धुमाकूळ घालत एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला बळजबरी आपल्या दुचाकीवर टाकून घेऊन गेले आहेत. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास संत चोखोबा वॉर्ड परिसरात घडली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी जखमी तरुणासह हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मोहन प्रकाश भुसारी असं हल्ला झालेल्या २२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. मोहन हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. वर्चस्वाच्या वादातून अथवा पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय वर्तवण्यात आला आहे. वृत्तानुसार, बुधवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास मोहन हा आपल्या घरात होता. दरम्यान त्याठिकाणी काही तरुणांचं टोळकं आलं. त्यांनी मोहनला हाक मारून घराबाहेर बोलावलं.
मोहन घराबाहेर येताच, आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत घरासमोर रक्ताचा सडा पाडला. यानंतर आरोपींनी मोहनला आपल्या दुचाकीवर बसून घेऊन गेले. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील रक्ताचा सडा पडलेलं चित्र पाहून परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना तपासाची चक्र फिरवत जखमी तरुणासह आरोपींना जुनोना घाटातून ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आरोपींकडून बंदुकही ताब्यात घेण्यात आली आहे. पण संबंधित बंदुक नकली असल्याचं समोर आलं आहे. पण ज्याठिकाणी तरुणावर हल्ला करण्यात आला. त्याठिकाणी परिसरातील लोकांनी गोळीबार केल्याचा आवाज ऐकल्याचं समोर आलं आहे. तर बंदुकीच्या मागच्या बाजूनं डोक्यात मारहाण केल्यानं तरुण जखमी झाल्याचा दावा आरोपींनी केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत

Leave a Reply