वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

भिऊ नका मी तुमच्या पाठी !
( चाल – तुझी नि माझी गम्मत वहिनी..)

तुमचे अमुचे घर काचेचे
कशास भांडण तंटा रं !
तिघेही भाऊ मिळून खाऊ
जनता वाजवो घंटा रं !।।

वेगवेगळे जरिही लढलो
एकदुज्या छातीवर बसलो
सत्तासाखर खाण्यासाठी
अडकविला गळी फंदा रं ।।

लफडे अन घोटाळे यांनी
झाली असू दे रे बदनामी
ईडी बिडीला करु दे काडी
बंद करू ना धंदा रं ! ।।

जनता ही तर असते भोळी
बनवुन तिजला शेकू पोळी
विरोध कोणी करता फिरवू
त्याच्यावर वरवंटा रं ! ।।

काकावाणी असे सारथी
भिती नुरे मग अर्थाअर्थी
भिऊ नका मी पाठी म्हणतो
माताजींचा सँटा रं ! ।।

   कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply