वऱ्हाडी ठेचा – अनिल शेंडे

आरती बेवड्यांच्या देवाची !

आरती विजुभाऊ । बेवड्यांचे तुम्ही ताऊ ।
ड्राय शहर ओले केले । किती धन्यवाद देऊ ।। आरती ..

देतो त्याला म्हणू देव । तुम्ही देवाधिदेव ।
तुमच्यामुळे बेवड्यांचे । फुटतील गावोगावी पेव ।। आरती …

गुत्तेवाल्यांवरी तुम्ही । केले अनंत उपकार ।
उपकार फेडावया । तुमच्या मागेपुढे धाऊ ।। आरती…

खंडणी मागायाला । नका कोणाकडे जाऊ ।
घरपोच पेट्यांमध्ये । आम्ही धाडु तुमचा खाऊ ।। आरती …

संस्थांनाही आता आमच्या। नाव तुमचेच देऊ।
फोटु लावुन बारामध्ये। तुमची आरतीच गाऊ ।। आरती..

    कवी -- अनिल शेंडे।

Leave a Reply