यवतमाळ, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के


यवतमाळ: ११ जुलै- यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरामध्ये आज रविवारी सकाळी ४. ४ रिस्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्याचे पडसाद हिंगोली जिल्ह्यापर्यंत उमटले. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरात देखील सकाळी साडे आठ वाजता सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे नांदेड शहरातील नागरिक घाबरून गेले होते. भूकंपशास्त्र राष्ट्रीय संकेतस्थळवर याची माहिती देण्यात आली आहे.
माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरात भूगर्भातून मोठा आवाज येत होते. याचा परीघ जवळपास १५० किमीपर्यंत होता. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये या धक्क्यामुळे धरणीकंप जाणवला. तसेच अर्धापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये, शेजारी असलेल्या वसमत तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी माहिती देताना सांगितले की, भूगर्भातील हालचालीमुळे या भागांमध्ये अशा स्वरूपाचे धक्के जाणवत असतात. दरम्यान, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Leave a Reply